Headlines

प्रजासत्ताक दिनी झालेल्या सांस्कृतिक स्पर्धेत प्राथमिक मराठी आमची शाळा मलकापूर ने पटकावला प्रथम क्रमांक

 

मलकापूर : प्रजासत्ताक दिनी मलकापूर क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या सांस्कृतिक स्पर्धेत प्राथमिक मराठी आमची शाळा या शाळेने उत्कृष्ठ कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. शाळेतील इयत्ता ३ री च्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी जय जवान जय किसान या थीम वर अप्रतिम नृत्य सादर केले. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर व प्रेक्षकांना हे नृत्य खूपच आवडले. कार्यक्रम संपल्यानंतर स्पर्धेचा निकाल जाहीर झाला या मध्ये शाळेला प्रथम क्रमांक देऊन सहभागी विद्यार्थी व विद्यार्थ्यांना व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व विनर ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. शाळेच्या या यशाबद्दल शिक्षण प्रेमी नागरीक, पालक व शिक्षण क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!