Headlines

मलकापूर मतदारसंघातून ऐतिहासिक विजयानंतर चैनसुख संचेती यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता!

 

मलकापूर ( दिपक ईटणारे ) मलकापूर-नांदुरा मतदारसंघात झालेल्या विधानसभा निवडणुकीत चैनसुख संचेती यांच्या विजयाने राजकीय वर्तुळात नवचैतन्य निर्माण झाले आहे. तब्बल 1,09,921 मते मिळवत 26,397 मतांच्या प्रचंड फरकाने विजय मिळवणाऱ्या संचेती यांनी मतदारसंघात भाजपचा झेंडा पुन्हा फडकवला आहे. त्यांच्या या यशाने केवळ पक्षाचा आत्मविश्वास वाढवला नसून त्यांची मंत्रीपदासाठीची दावेदारीही अधिक मजबूत केली आहे.

विकासाचा अजेंडा आणि जनतेचा विश्वास

चैनसुख संचेती हे केवळ एक नेते नसून विकासाची प्रतिके बनले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मलकापूर मतदारसंघात अनेक प्रकल्प मार्गी लागले. त्यांनी प्रामुख्याने जिगाव सिंचन प्रकल्पासारख्या महत्वाकांक्षी योजनेवर सातत्याने लक्ष केंद्रित केले. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होईल, यामुळे शेती उत्पादनात वाढ होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल.

राजकीय अनुभवाचा ठेवा

चैनसुख संचेती हे पाच वेळा आमदार राहिलेले एक अनुभवी नेते आहेत. 2019 च्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला, मात्र त्यांनी आत्मपरीक्षण करत मतदारसंघातील प्रत्येक घटकांशी पुन्हा विश्वासाचे नाते जोडले. त्यांच्या या मेहनतीचे फळ त्यांना 2024 च्या निवडणुकीत मिळाले.

मंत्रीपदासाठी योग्य दावेदार

मलकापूर-नांदुरा मतदारसंघातील जनतेच्या अपेक्षा आणि विकासाचे त्यांचे ध्येय पाहता, चैनसुख संचेती हे मंत्रीपदासाठी सर्वार्थाने पात्र ठरतात. त्यांच्या नेत्याखाली मतदारसंघातील शेतकरी, व्यापारी, महिला, युवक, सर्वांनी विकासाचा अनुभव घेतला आहे. मंत्रीपद मिळाल्यास संचेती हे आपला मतदारसंघ केवळ विदर्भच नव्हे तर महाराष्ट्राच्या विकासाचा एक आदर्श प्रकल्प बनवतील.

पक्षश्रेष्ठींनी लक्ष घालण्याची आवश्यकता

चैनसुख संचेती यांचा विजय केवळ निवडणुकीतील यश नाही, तर भाजपच्या विचारधारेवर जनतेचा वाढता विश्वास आहे. आता पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या कामगिरीला दाद देत त्यांना मंत्रीमंडळात स्थान दिल्यास, मतदारसंघातील विकासाला गती मिळेल. शिवाय, विदर्भातील भाजपच्या प्रभावी नेतृत्वाला अधिक बळकटी मिळेल.

मलकापूर शहरात विजयाचा जल्लोष साजरा होत असताना, “चेनू भाऊ, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं!” या घोषणांमागे जनतेची विकासाची अपेक्षा आहे. आता संचेती हे त्या अपेक्षांची पूर्तता करून, महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आपली ठसा उमटवतील, अशी सर्वांची आशा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!