Headlines

भाजपच्या पहिल्या यादीत मलकापूर चे नाव नाही ? मलकापूर मतदारसंघात भाजपकडून कोणाला मिळणार उमेदवारी ? मनीष लखानी यांच्या नावाची चर्चा

मलकापूर : भारतीय जनता पार्टीच्या वतीने काल विधानसभेच्या ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यात बुलडाणा जिल्ह्यातील तीनही भाजपाच्या विद्यमान आमदारांची नावे असून मलकापूर विधानसभा मतदार संघाचा समावेश नसल्याने मलकापूर मतदार संघातून भाजपाचा उमेदवार कोण? अशी चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये महायुतीचा घटकपक्ष असलेल्या भाजपाच्या वाट्याला चार जागा असून त्यापैकी त्यामध्ये मलकापूर, खामगाव, जळगाव जा. व चिखली मतदार संघाचा समावेश आहे. या चार मतदार संघापैकी खामगाव, जळगाव जा. व चिखली मतदार संघामध्ये भाजपाने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली. मात्र या यादीमध्ये मलकापूर विधानसभा मतदार संघातून उमेवाराच्या नावाचा समावेश नसल्याने भाजपाच्या गोटासह मतदारांमध्ये सुध्दा भाजपाचा उमेदवार कोण? याबाबत चांगलीच उत्सुकता लागली आहे. भाजपाकडून यावेळी अनेकांनी उमेदवारी मागितली असून मतदार संघातील उमेदवारीचा हा घोळ येत्या काही दिवसात निस्तारणार असला तरी भाजपाकडून कोणाच्या गळ्यात
उमेदवारीची माळ पडते याकडे संपूर्ण मतदार संघाचे लक्ष लागले आहे. दरम्यान मलकापूर मतदारसंघांमध्ये भाजपच्या दोन मोठ्यां नेत्यांचे आपसी वाद असल्याने मलकापूर मतदारसंघाचे पहिल्या यादीत नाव आले नसल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. दरम्यान येत्या काही दिवसात भाजपचे दुसरी यादी जाहीर होणार असून त्यामध्ये मलकापूर मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळणार हे बघणे महत्वाचे ठरेल. मात्र सद्यस्थिती मलकापूर मतदार संघात मनीष लखानी यांच्या नावाची चर्चा जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *