खामगाव : तालुक्यातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस एका युवकाने फुस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत तालुक्यातील एका गावातील मुलीच्या वडीलांनी खामगाव ग्रामीण पोस्टेला तक्रार दिली आहे. तक्रारीत त्यांनी म्हटले की त्यांच्या १७ वर्षीय मुलीस केशव साहेबराव हागे रा. चितोडा याने फुस लावून पळवून नेले.या तक्रारीवरुन पोलिसांनी केशव हागे याच्याविरुध्द कलम १३७ (२) भारतीय न्याय संहीता नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.