खामगावः गजानन महाराज मंदिरातील दानपेटीवर चोरट्याने काळी नजर ठेवून दानपेटी फोडून त्यातील पाच हजार रुपये आणि दोन स्टीलचे डबे लंपास केले. ही घटना गुरुवारी उघडकीस आली.
तक्रारीनुसार, पिंपळगाव राजा येथील श्री गजानन महाराज मंदिरातील कुलूप तोडून चोरट्याने दानपेटी फोडून त्यातील पाच हजार रुपये तसेच दोन स्टीलचे डबे चोरून नेले. ही घटना गुरुवारी पहाटे पुजारी मंदिरात गेल्यानंतर उघडकीस आली याप्रकरणी अशोक निनाजी इंगळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञान चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पिंपळगाव राजा पोलिस करीत आहेत. गेल्या अनेक महिन्यापासून चोरींच्या घटनांमध्ये वाढ झाली असून चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांसमोर मोठे आवाहन आहे.