खामगाव :- शहरातील महामार्गावरील टेंभूर्णा फाट्याजवळ असलेल्या बंद हॉटेलमधून अज्ञात चोरट्यांनी २२ हजार रुपयांचे साहित्य चोरी केल्याची घटना समोर आली आहे. कृष्णकांत राजविलास देशमुख यांच्या मालकीचे हॉटेल सरोवर काही दिवसांपासून बंद होते. रात्रभर चोरट्यांनी हॉटेलचे शटर तोडून आत प्रवेश केला व हॉटेलमधील विविध साहित्य लंपास केले. या साहित्यामध्ये १५ लोखंडी खाट, ४ सिलींग फॅन, बोअरची मशीन, पाण्याची मोटर, गॅस शेगडी, गॅस सिलेंडर, लोखंडी कपाट, सिसीटीव्ही कॅमेऱ्याचे सेटअप, भांडे, लोखंडी टेबल आणि वायर इत्यादींचा समावेश आहे. या चोरीची माहिती कळताच देशमुख यांनी खामगाव ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार दिली,त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.