Headlines

क्षुल्लक कारणावरून महिलेस मारहाण,आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल! मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथील घटना

मोताळा – क्षुल्लक कारणावरून घरात अनधिकृत प्रवेश करून एका महिलेस चापटबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना २२ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास धामणगाव बढे येथे घडली आहे. याप्रकरणी फिर्यादीवरून धामणगाव बढे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तालुक्यातील धामणगाव बढे येथील दीपाली विनोद कादेले यांनी धामणगाव बढे पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार २२ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास गावातीलच नारायण रामदास बडे यांनी फिर्यादीच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करत क्षुल्लक कारणावरून चापटबुक्क्यांनी मारहाण केली यावेळी फिर्यादीची आई आणि सासू यांनी आवरण्याचा प्रयत्न केला असता त्यांना लोटून देत अश्लील शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरून धामणगाव बढे पोलिसांनी नारायण रामदास बडे याच्याविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार नागेश जायले यांच्या मार्गदर्शनात पोहेकॉ सुरेश सोनवणे हे करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *