जलंब: भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या काका-पुतण्याला मारहाण झाल्याची घटना कोक्ता फाटा येथील गारवा हॉटेलसमोर ३ जानेवारी रोजी संध्याकाळी ७.३० वाजता घडली. निलेश शेषराव ताठे आणि त्यांचे काका महेश नामदेव ताठे हे गारवा हॉटेलसमोर उभे होते. यावेळी खामगावकडून येणाऱ्या चारचाकी वाहन व मोटरसायकलमुळे झालेल्या धक्क्यावरून वाद झाला. वाद मिटवण्यासाठी पुढे गेलेल्या महेश ताठे यांना शुभम संतोष चांदुरकर आणि दोन अनोळखी व्यक्तींनी मारहाण केली.या प्रकरणी निलेश ताठे यांच्या तक्रारीवरून जलंब पोलीस ठाण्यात शुभम चांदुरकर व दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास ठाणेदार अमोल सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेश हिवाळे करत आहेत.
गाडीला धक्का लागण्याच्या कारणावरून काका-पुतण्याला मारहाण, जलंब पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल
