Headlines

आमदार राजेश एकडेंचा विकासाचा मंत्र जनतेच्या मनात घर करताना, विरोधकांसाठी मोठे आव्हान”

मलकापूर( उमेश इटणारे ) : आमदार राजेश एकडे यांचे पाच वर्षांच्या कालावधीत झालेले विकासकामे आणि जनतेशी असलेला थेट संपर्क, आगामी निवडणुकीत त्यांच्यासाठी विजयाचा मजबूत पाया ठरताना दिसत आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गावागावातून “राजूभाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं” अशा घोषणा आणि स्वागताचा गजर होत असून मतदारसंघात त्यांचा प्रभाव वाढत आहे.
राजेश एकडे यांनी गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात अनेक ठोस विकासकामे केली आहेत. ग्रामीण रस्त्यांचे जाळे विणणे आणि शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या सुविधा वाढवणे, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुधारणा, शिक्षणाच्या सुविधा वाढवून तरुणांना संधी उपलब्ध करून देणे, स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसाठी विशेष प्रकल्प या कामांमुळे मतदारसंघातील लोकांनी त्यांना “लोकनेते” अशी ओळख दिली आहे. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत असलेल्या राजेश एकडे यांच्या यशस्वी कामगिरीमुळे विरोधकांना प्रचारात कोंडीला सामोरे जावे लागत आहे.
गावागावातून प्रचारासाठी फिरत असताना महिलांचा, तरुणांचा आणि शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे. “आमचे प्रश्न सोडवणारे, आमच्या अडचणींना प्रतिसाद देणारे आमदार आम्हाला पुन्हा हवे आहेत,” असे मतदार खुलेपणाने मांडत आहेत.

*विरोधकांसाठी उभे झालेले आव्हान*

राजेश एकडे यांनी पाच वर्षांत केलेल्या कामांमुळे विरोधकांकडे विकासाचा ठोस अजेंडा नाही. त्यामुळे राजेश एकडे यांच्या कामगिरीवर टीका करण्याऐवजी विरोधक भावनिक मुद्दे किंवा खोट्या आश्वासनांवर भर देताना दिसत आहेत. मात्र, मतदार विकासाचे समर्थन करत असल्याने विरोधकांची ही रणनीती अयशस्वी ठरत आहे.

*यशाचे सूत्र – नेतृत्व आणि विश्वास*

राजेश एकडे यांचा जनतेशी असलेला थेट संवाद आणि प्रत्येक समस्येवर उपाय शोधण्याची तत्परता हा त्यांचा सर्वात मोठा गुण मानला जातो. लोकांच्या छोट्या-मोठ्या प्रश्नांवर लक्ष देऊन त्यांनी मतदारसंघात विश्वासार्हता निर्माण केली आहे. या नेतृत्वामुळे मतदारसंघातील जनतेला वाटते की, “राजेश एकडे हे आमदार असूनही आपलेपणाने आमच्यात मिसळतात.”

*निवडणुकीचा अंदाज*

प्रचारादरम्यान मिळणाऱ्या प्रतिसादावरून विरोधकांसाठी निवडणूक अधिकाधिक कठीण होत चालली आहे. “राजूभाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं” या घोषणांचा गजर प्रत्येक गावात ऐकायला मिळत असून, मतदारसंघात सध्या एकडे यांच्याच विजयाचे वारे वाहत आहेत. राजेश एकडे यांचे पाच वर्षांतील यश आणि आगामी काळासाठी त्यांनी मांडलेले विकासाचे व्हिजन पाहता, मतदारांचा मोठा कौल पुन्हा त्यांच्याच बाजूने जाण्याची शक्यता आहे. “विकास हेच साधन, प्रामाणिकपणा हेच अस्त्र,” अशा धोरणाने काम करणारे एकडे यांचे नेतृत्व मतदारसंघासाठी महत्त्वाचे ठरले आहे, हे निःसंशय आहे.
“राजेश एकडे यांचे नेतृत्व हे विकासाचा खरा मार्ग दाखवणारे ठरले आहे, त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे,” असे राजकीय जाणकारांचेही मत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *