Headlines

“एक रहे तो सेफ रहे” मलकापूर मतदारसंघात चैनसुख संचेती यांचा रेकॉर्डब्रेक मतांनी ऐतिहासिक विजय!

मलकापूर (उमेश ईटणारे) – मलकापूर-नांदुरा मतदारसंघात चैनसुख संचेती यांच्या विजयी जल्लोषाने एक ऐतिहासिक क्षण निर्माण केला. “चेनू भाऊ, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं!” या घोषणांनी मलकापूर शहर दणाणून गेले. 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर संपूर्ण मतदारसंघात विविध चर्चा सुरू होत्या. काहींना ही निवडणूक अटीतटीची वाटत होती, तर काहींनी राजेश एकडे यांचा विजय निश्चित मानला होता.

मात्र, 23 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतमोजणीत पहिल्या फेरीपासूनच चैनसुख संचेती यांनी आघाडी घेतली. त्यांनी तब्बल 1,09,921 मते मिळवत 26,397 मतांच्या विशाल फरकाने विजय मिळवला. या विजयासह चैनसुख संचेती हे बुलडाणा जिल्ह्यातील सातही मतदारसंघांतील सर्वाधिक मतांनी विजय मिळवणारे उमेदवार ठरले.
चैनसुख संचेती यांच्या विजयानंतर मतदारसंघातील हिंदू मतदार आणि विशेषतः महिलांनी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास चर्चेचा विषय ठरला. “मतरूपी आशीर्वाद” म्हणून त्यांना दिलेला पाठिंबा त्यांच्या विजयासाठी निर्णायक ठरला.

विजय रॅलीचा उत्सव

चैनसुख संचेती यांच्या विजयाच्या रॅलीने मलकापूर शहरात जल्लोषाचे वातावरण निर्माण केले. पंचमुखी हनुमान मंदिरापासून सुरू झालेली रॅली माता महाकाली चौक, सत्यम चौक, हनुमान चौक, तहसील चौक, आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे समाप्त झाली. रॅलीदरम्यान हजारो समर्थकांनी उपस्थिती लावली, पुष्पवृष्टी केली, आणि आनंद व्यक्त केला.

जनतेच्या विश्वासाचा विजय

चैनसुख संचेती यांच्या विजयाचा अर्थ केवळ मतांची संख्या नव्हे, तर जनतेचा त्यांच्यावर असलेला विश्वास आणि प्रेम यावर आधारित आहे. ही निवडणूक लोकशाहीचा खरा अर्थ स्पष्ट करते – नेतृत्व हे जनतेच्या पाठिंब्यावर उभे असते.
चैनसुख संचेती यांच्या विजयाने मलकापूर-नांदुरा मतदारसंघासाठी नवीन आशा निर्माण केली आहे. हा विजय म्हणजे एकतेचा, विश्वासाचा आणि कष्टाचा प्रतीक असून जनतेच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या नेतृत्वाचा हा विजय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!