मोताळा :- तालुक्यातील कोथळी येथील एका २७ वर्षीय महिला ११ फेब्रुवारीच्या मध्यरात्री बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात मिसिंग नोंद करण्यात आली आहे. फिर्यादीनुसार, सादिक खान रोशन खान यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य रात्री जेवण करून झोपले होते. दरम्यान, मध्यरात्री १२.३० वाजता त्यांच्या पत्नी पाणी पिण्यासाठी उठल्या असता, मुलगी आसमा फिरदोस शेख असलम (वय २७) ह्या घरात दिसल्या नाही. नातेवाईक तसेच इतर ठिकाणी शोध घेतल्यानंतरही ती मिळून आली नाही. सदर महिलेचे वर्णन रंग गोरा, उंची ५ फूट, अंगात मेहंदी रंगाची सलवार पॅन्ट आहे. या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी मिसिंगची नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे.
मोताळा तालुक्यातील कोथळी येथील २७ वर्षीय महिला बेपत्ता!
