Headlines

शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सिंचनाच्या माध्यमातून सर्वांगीण प्रगती साधणे म्हणजे विकास – चैनसुख संचेती रस्ते आणि पूल बांधण्याला विकास म्हणता येत नाही पत्रकार परिषदेतून माजी आ. संचेती यांचा विद्यमान आमदारांवर टीका..

मलकापूर (उमेश इटणारे ):- विधानसभा मतदारसंघातील विकासाची नवी संकल्पना मांडत भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती यांनी आज आपल्या वचननामा पुस्तिकेचे अनावरण केले. या वचननाम्यात शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सिंचन या महत्त्वाच्या चार स्तंभांवर आधारित सर्वांगीण विकासाचा दृष्टिकोन मांडण्यात आला आहे.

यावेळी बऱ्हाणपूरचे माजी महापौर अनिल भोसले, भाजपा नेते मोहन शर्मा, तालुकाध्यक्ष ज्ञानदेव वाघोदे, शहराध्यक्ष शंकरराव पाटील, आणि रामभाऊ झांबरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात संचेती यांनी स्पष्ट शब्दांत मतदारसंघाच्या प्रगतीसाठी असलेले आपले व्हिजन मांडले.
“सर्वसामान्यांच्या अडचणी म्हणजे माझ्याच अडचणी आहेत. त्या सोडवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करत आलो आहे आणि भविष्यातही हा संकल्प कायम ठेवणार आहे,” असे त्यांनी भावनिक स्वरूपात सांगितले. संचेती यांनी आपल्या वचननाम्यातील विकासाच्या मुद्द्यांवर विशेष भर दिला. “रस्ते, पूल किंवा इतर पायाभूत सुविधा बांधणे हा खरा विकास नाही, तर शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सिंचनाच्या माध्यमातून सर्वांगीण प्रगती साधणे महत्त्वाचे आहे,” असे ठाम मत त्यांनी मांडले. संचेती यांच्या मते, मागील पाच वर्षांत फक्त विकासाच्या गप्पा मारल्या गेल्या, मात्र प्रत्यक्ष कृती दिसून आली नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघाचा खरा विकास साधण्यासाठी ठोस पावले उचलली जातील, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

*मतदारसंघाच्या भविष्याचा नवा आराखडा*

संचेती यांच्या वचननाम्यात पुढील विकासाची दिशा स्पष्ट करण्यात आली आहे:

उत्कृष्ट शिक्षण प्रणाली उभारणी

आरोग्य सुविधा अधिक सक्षम करणे

बेरोजगारीवर ठोस उपाय

सिंचनासाठी प्रभावी योजना

या सर्व वचनांची पूर्तता करून मतदारसंघाचा कायापालट करण्याचा दृढनिश्चय संचेती यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे मतदारांमध्ये आशादायी वातावरण निर्माण झाले आहे.
मतदारसंघाच्या हितासाठी विकासाचे नवीन अध्याय लिहिण्यास सज्ज असलेल्या चैनसुख संचेती यांना मतदारांचा प्रचंड पाठिंबा लाभेल, अशी अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *