खामगाव : खेळता खेळता पुलावरून पडल्याने एका सात वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना खामगाव तालुक्यातील कारेगाव येथे बुधवारी दुपारी घडली. या घटनेमुळे कारेगाव गावात एकच शोककळा पसरली आहे.
प्राप्त माहितीनुसार, कारेगाव येथील इयत्ता दुसरीत शिकणारा यश अरुण बोदडे हा चिमुकला खेळण्यासाठी गावानजीक असलेल्या पुलावर गेला. खेळता खेळता तो पाण्यात पडून मोरीत अकडला. त्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, या घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.दरम्यान यशचा शोध घेण्यात आला बऱ्याच प्रयत्नानंतर त्याचा मृतदेह पुलानजीकच्या मोरीत सापडला, यशचे पार्थिव शवविच्छेदनासाठी उपजिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले.