मलकापूर ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा )– शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला काळीमा फासणारी संतापजनक घटना मलकापूर शहरात उघडकीस आली आहे. दोन शिक्षकांनी एका विद्यार्थ्याच्या आईवर मुलाच्या यशाच्या आमिषाने शारीरिक अत्याचार केल्याची गंभीर तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
34 वर्षीय पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, 45 व 47 वर्षीय दोन शिक्षकांनी “तुझ्या मुलाला चांगले मार्क देऊ, पहिला नंबर मिळवून देऊ,” असे सांगत मानसिक दबाव आणून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. इतकेच नव्हे तर, वारंवार अशाच प्रकारच्या मागण्या करत तिला जिवे मारण्याच्या धमक्याही दिल्या. ही घटना 10 सप्टेंबर 2024 ते 22 एप्रिल 2025 दरम्यान मलकापूर शहरातील एका अपार्टमेंटमध्ये घडली. पीडित महिला मानसिकदृष्ट्या खचून गेल्यानंतर शेवटी तिने धैर्य करून पोलीस ठाण्यात धाव घेतली.
या प्रकरणी संबंधित दोघांविरोधात भारतीय न्यायसंहितेच्या (BNS) कलम 64(2)(m), 70(1), 351(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जी. कौळासे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.