Headlines

महाविद्यालयाच्या प्रगतीत मोठी भरारी – पद्मश्री डॉ. व्ही. बि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयास एनबीए चा बहुमान!

मलकापूर: स्थानिक मलकापूर येथील पद्मश्री डॉ. व्ही. बि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाने राष्ट्रीय मान्यता मंडळाची नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिटेशन एनबीए प्रतिष्ठेची सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल मान्यता प्राप्त केली आहे. या मान्यतेमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची अधिकृत मोहर लागली असून, विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी नवी दारं खुली झाली आहेत.

राष्ट्रीय मान्यता मंडळ एन बी ए ही भारतातील तांत्रिक शिक्षण संस्थांसाठी एक अत्यंत प्रतिष्ठेची मान्यता संस्था आहे. ती मिळवण्यासाठी कठोर निकष पूर्ण करावे लागतात, ज्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता, प्रयोगशाळा सुविधा, संशोधन कार्य, उद्योग सहकार्य, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि शिक्षकांचे गुणवत्ता मूल्यांकन या बाबींचा समावेश होतो.

ही मान्यता मिळवण्यासाठी प्राचार्य डॉ. अनिल खर्चे, प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे, एनबीए अधिकारी प्रा. रमाकांत चौधरी, तसेच सर्व विभागप्रमुख व प्राध्यापकांनी विशेष मेहनत घेतली. यामध्येप्रा. नितीन खर्चे, डॉ. अमोघ मालोकार, प्रा. योगेश सुशीर, प्रा. संतोष शेकोकार, प्रा. सुदेश फरफट,प्रा. संदीप खाचणे, प्रा. महेश शास्त्री, प्रा. साकेत पाटील, प्रा. गजानन सुपे, तसेच ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा. पांडुरंग चोपडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळाने या प्रक्रियेसाठी महत्वपूर्ण पाठिंबा दिला. या मान्यतेचे श्रेय अध्यक्ष श्री. डी. एन. पाटील उपाख्य नानासाहेब पाटील, उपाध्यक्ष श्री. प्रदीपभाऊ कोलते, सचिव डॉ. अरविंद कोलते, खजिनदार श्री. सुधीर पाचपांडे, तसेच सदस्य श्री. अनिल इंगळे, श्री. देवेंद्र पाटील, श्री. पराग पाटील आणि डॉ. गौरव कोलते यांना जाते. या सर्वांच्या सहकार्यामुळेच महाविद्यालयाने ही मान्यता मिळवण्यात यश संपादन केले.

एन बी ए मान्यता मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक फायदे होणार आहेत. विद्यार्थ्यांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्च शिक्षण व नोकरीसाठी अधिक चांगल्या संधी उपलब्ध होतील. नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटच्या संधी वाढतील. शिष्यवृत्ती तसेच औद्योगिक सहकार्य यामुळे त्यांना उच्च दर्जाचे शिक्षण घेण्याचा फायदा मिळेल.

महाविद्यालयाने आपली गुणवत्ता सिद्ध केली असून, भविष्यातही उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात नवे उच्चांक गाठण्याचा संकल्प केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!