नाही जखमेची तमा, नाही आरोग्याच भान फक्त हरिनामाची गोडी मलकापूरात पांडुरंगाच्या भक्तीभावाचा आगळावेगळा दृष्टांत…!

मलकापूर: देवाच्या नामात वेगळीच जादू आहे.त्यात देहभान विसरून भक्तीभावाने भाविक अक्षरशः न्हाऊन निघत असतात.अशाच पध्दतीचा प्रसंग विदर्भाच्या प्रवेशद्वारी मलकापूरात अधोरेखीत झाला आहे.काकडा आरती समारोपाच्या निमित्ताने जखमेची तमा न बाळगता पुंडलिक जगताप यांच्या माध्यमातून पांडुरंगाच्या भक्तीभावाचा आगळावेगळा दृष्टांत दिसून आला आहे.
पांडुरंगाच्या नामस्मरणात वेगळीच जादू आहे.त्याच मनोभावे स्मरण केल्यास माणसाच्या दुःख व वेदना कमी झाल्या शिवाय राहत नाही.अस मानल्या जाते.किंबहुना सांगायचे झाल्यास त्या धरतीवर एक नव्हे अनेक उदाहरणे पुढे येतात.विशेष म्हणजे जनसामान्यांच्या लेखी त्या विषयाची अनुभूती अनेकांना आली असल्याने हि बाब स्पष्ट होते.
येथील छत्रपती शिवाजी नगरातील रहीवाशी असलेले पुंडलिक किसनराव जगताप वयाची अमृत महोत्सवी पार केल्यानंतर त्यांची आयुष्याची वाटचाल सुरू आहे.अर्थात एका पाठी एक अशा डोंगराएवढ्या दुःखातून स्वतः ला सावरत असतानाच भजनाच्या माध्यमातून त्यांची पांडुरंगाची आराधना अविरत चालू आहे.
चार दिवसांपूर्वी पुंडलिक किसनराव जगताप यांच्या दुचाकीचा अपघात झाला.पायाला गंभीर दुखापत झाली त्यामुळे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया व उपचार करून विश्रांतीचा सल्ला दिला.जय भवानी भजनी मंडळाच्या काकडा आरतीचे वर्षानूवर्षे सदस्य असलेल्या पुंडलिकरावांची भजनात सहभागी होण्याची अस्वस्थता शिगेला पोहोचली होती.
कार्तिक शुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आज सर्वदूर काकडा आरतीची सांगता केली जाते.त्याच धरतीवर येथील छत्रपती शिवाजी नगरातील काकडा आरती मार्गक्रमण करत असतांना दरवाजासमोर उभी ठाकली.मग कायं जखमेची व आरोग्याची कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता पुंडलिक जगताप यांनी भजनात सहभाग नोंदविला.पांडूरंगाच सुंदर भजन सादर करून अखंड हरिनामात तल्लीन झाले.हा नजारा अनेकांनी याची देही याची डोळा पाहिल्यावर चकित झाले.या निमित्ताने सगळ्यांना पांडुरंगाच्या भक्तीभावाचा आगळावेगळा दृष्टांत झाला एवढे मात्र खरे…!

Leave a Comment

error: Content is protected !!