नांदुरा : ग्राम महाळुंगी येथे २ व ३ ऑक्टोबरच्या रात्री संशयास्पदरित्या भटकणाऱ्या आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आमिर खान अहमद खान (वय २९) रा. नवाबपुरा नांदुरा हा महाळुंगी येथे अंधारात स्वतःला लपवून दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने आढळून आला.पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडे कुठल्याही प्रकारची मौल्यवान वस्तू मिळाली आली नाही. सदर आरोपी चोरीसारखा दखलपात्र गुन्ह्या करण्याच्या उद्देशाने स्वतःला लपवीत होता. पोलिसांनी आरोपी विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ खाली गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोहेकॉ जाधव करीत आहेत.