मलकापूर :केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू केलेली आहे. या काळात सोशल मीडियावरील वेगवेगळ्या ग्रुपवर वादग्रस्त वक्तव्य, पोस्ट, फोटो किंवा व्हिडीओ छेडछाड करून ते व्हायरल केले जातात. यामुळे वाद होण्याची शक्यता असते. एखाद्या सदस्याने जरी वादग्रस्त मेसेज केला, तर ग्रुप अॅडमिनवरही कारवाई होणार आहे. त्यामुळे अॅडमिनने आजच सेटिंग बदलण्याची गरज आहे. शिवाय एखादी वादग्रस्त पोस्ट कोणी शेअर केल्यास ती तातडीने डिलिट करावी अन्यथा सदस्य, व ग्रुप ॲडमिनला पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात आदर्श आचारसंहिता लागू असल्याने सोशल मीडियावर पोलिसांचे विशेष लक्ष आहे.