Headlines

हिराबाई संचेती कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे 78वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न

मलकापूर :- आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांच्या राजवटीतून मुक्त झाला .आपल्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्यसंग्रामातील अनाम वीर, क्रांतिकारक व स्वातंत्र्यसंग्रामात घडलेल्या घटना ,यांचे सतत स्मरण व्हावे. स्वातंत्र्यासाठी पेटवलेली मशाल कायम तेवत राहावी व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायम आपल्यात राहावी .आपल्या देशाच्या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी आपण हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो. मलकापूर शिक्षण समितीचे सन्माननीय संचालक श्री कमलकिशोरजी टावरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मलकापूर शिक्षण समितीचे सन्माननीय उपाध्यक्ष श्री राजेश महाजन हे देखील याप्रसंगी उपस्थित होते. शाळेच्या प्राचार्या सौ ममताताई पांडे आणि उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भारत स्काऊट गाईड युनिट कडून वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ वैशाली जोशी आणि श्री अमर जोशी यांनी केले याप्रसंगी शाळेच्या पर्यवेक्षिका सौ खडसे , सरस्वती प्राथमिक कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पाटील मॅडम, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *