Headlines

मोताळ्यात 23 वर्षीय युवकाकडून देशी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त!

मोताळा : विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना तालुक्यात एका युवकाकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. रोहीणखेड शिवारातील या कारवाईत आरोपी शेख अरबाज शेख महमूद (वय २३, रा. इकबाल नगर, बुलडाणा) याला पोलिसांनी अटक केली आहे. घटनेचा तपशील असा की, बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दीपक लेकुरवाळे आणि त्यांचे सहकारी १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी रोहीणखेड परिसरात गस्त घालत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली. या माहितीनुसार, हिंदू स्मशानभूमीजवळ एका संशयित व्यक्तीची हालचाल असल्याचे आढळले. पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकत युवकाला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान, युवकाने आपले नाव शेख अरबाज असल्याचे सांगितले. पंचासमक्ष घेतलेल्या अंगझडतीत त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे आढळून आली. एकूण ४२ हजार रुपये किमतीचा हा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईत पोलीस हवालदार दीपक लेकुरवाळे, शेख चांद, नायक पोलीस जमादार गणेश पाटील, गजानन गोरले, तसेच धामणगाव बढेचे ठाणेदार नागेश जायले, जमादार सुरज रोकडे व नितीन इंगळे यांनी सहभाग घेतला. या घटनेची नोंद धामणगाव बढे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३, २५ आणि मुंबई पोलीस अधिनियम कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास धामणगाव बढे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राहुल वरारकर हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *