Headlines

मलकापूर आगारासाठी एसटी कष्टकरी जनसंघाची नवीन कार्यकारिणी जाहीर

मलकापूर :- एसटी कष्टकरी जनसंघ मलकापूर आगार बुलढाणा विभागाच्या २०२५-२६ साठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरचिटणीस उमेशभाऊ पवार, विभागीय अध्यक्ष शिवाजी भाऊ आनंदे आणि विभागीय सचिव रामभाऊ सवडतकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सर्वसहमतीने कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
बैठकीत कष्टकरी हक्क आणि संघटनेच्या पुढील वाटचालीबाबत चर्चा झाली. उपस्थित सर्व सदस्यांच्या एकमताने ही कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली.

नवीन कार्यकारिणीची नावे
अध्यक्ष: ज्ञानेश्वर शामराव आव्हाड
सचिव: नितीन सहदेवराव सदावर्ते
प्रमुख मार्गदर्शक: गजानन काका तायडे
उपाध्यक्ष: संदीप उत्तमराव जायभाये
कार्याध्यक्ष: उमेश भाऊ खताळ
संघटक सचिव: विनोद दादा लहासे
सहसचिव: गजानन भाऊ शेगोकार
प्रसिद्धी प्रमुख: शिवाजीराव जगदाळे
महिला संघटक: प्रतीभाताई कोळी
सदस्य: राजुभाऊ भोपळे, सागर भाऊ इंगळे, उमेश भाऊ पवार, ईश्वर भाऊ तायडे, अतुल शेले

संघटनेच्या भविष्यातील धोरणांवर मार्गदर्शन करताना पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प केला.
बैठकीनंतर सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले आणि पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!