मोताळाः एका अल्पवयीन मुलीशी लग्न लावून देत अत्याचार केल्याची घटना १ जानेवारी २०२३ ते २६ सप्टेंबर २०२४ दरम्यान मोताळा तालुक्यातील एका गावात घडली आहे. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या जबाबावरून चार जणांविरुद्ध बोराखेडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील एका गावातील एका १६ वर्षीय मुलीने बुलढाणा येथील स्त्री रुग्णालयात उपचार घेत असतांना दिलेल्या जबाबानुसार मागील वर्षी जानेवारी २०२३ मध्ये मिथुन माळी सोबत सासरच्या व माहेरच्या मंडली समक्ष पीडितेचे लग्न झाले होते. त्यानंतर पीडिता ही सासरी नांदायला गेली. पीडितेला मिथुन माळी यांच्यापासून एक ऑक्टोबर २०२४ रोजी मुलगी झाली, असे पोलिसांना दिलेल्या जबाबावरून बोराखेडी पोलिसांनी मिथुन अंबादास माळीसह अन्य चार जणांविरोधात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. तपास एपीआय बालाजी शेंगेपल्लू करीत आहे.