मलकापूरचे नवनिर्वाचित आमदार चैनसुख संचेतींनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ!

मलकापूर : मलकापूर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार चैनसुख संचेती यांनी आज, ७ डिसेंबर २०२४ रोजी विधानसभेचे सदस्यत्व स्वीकारत शपथ घेतली.विधानसभा भवनात झालेल्या विशेष अधिवेशनात हंगामी सभापती श्री. कालिदास कोळंबकर यांनी नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिली. यावेळी चैनसुख संचेती यांनी विधानसभेत शपथ घेतली.

हा विशेष अधिवेशन तीन दिवस चालणार असून, ९ डिसेंबर २०२४ रोजी नवीन सभापतींची निवड होईल. त्यानंतर महायुती सरकारसाठी विश्वासदर्शक ठराव सभागृहात मांडला जाणार आहे. विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर, राज्यपाल दोन्ही सभागृहांना संबोधित करणार आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!