Headlines

विधानसभेच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज, 15 लाख 6 हजार 925 मतदार ठरवतील जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघाचे आमदार..

बुलढाणा: जिल्ह्यातील मलकापूर, बुलढाणा, चिखली, सिंदखेड राजा, मेहकर, खामगांव आणि जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाच्या २० नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर मतमोजणी २३ नोव्हेंबरला होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, चोख पोलीस बंदोबस्तात मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. या प्रक्रियेतील ११५ उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय घेतला जाईल. प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी १४ टेबल ठेवण्यात आले आहेत.

मतमोजणीचे ठिकाण आणि फेऱ्या:

मलकापूर विधानसभा – कृषी उत्पन्न बाजार समिती, बेलाड यार्ड मलकापूर (२२ फेऱ्या)

बुलढाणा विधानसभा – निवडणूक विभाग इमारत, तहसिल चौक मागे बुलढाणा (२४ फेऱ्या)

चिखली विधानसभा – तालुका क्रिडा संकुल बॅडमिंटन हॉल चिखली (२३ फेऱ्या)

सिंदखेड राजा विधानसभा – महाराष्ट्र राज्य वखार सहकार गोदाम, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर (२५ फेऱ्या)

मेहकर विधानसभा – महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ गोदाम क्रमांक ५ मेहकर (२५ फेऱ्या)

खामगांव विधानसभा – सरस्वती विद्या मंदिर हॉल खामगाव (२३ फेऱ्या)

जळगाव जामोद विधानसभा – नवीन प्रशासकीय इमारत जळगाव जामोद (२३ फेऱ्या)

मतमोजणी प्रक्रिया: सकाळी ८ वाजता सुरू होणारी मतमोजणी सुरूवातीला टपाली मतदानाची मोजणी होईल आणि नंतर ईव्हीएम मतदानाची मोजणी सुरू होईल. प्रत्येक मतमोजणी टेबलवर एक कोतवाल, मतमोजणी अधिकारी, पर्यवेक्षक व सूक्ष्म निरीक्षक नियुक्त केले आहेत. मतमोजणीचे कार्य सुरळीतपणे पार पडावे यासाठी व्यापक तयारी करण्यात आली आहे.

मतदानाची टक्केवारी: संपूर्ण जिल्ह्यातील 21 लाख 34 हजार 500 मतदारांपैकी पंधरा लाख सहा हजार 925 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ७,९१,०८७ पुरुष, ७,१५,८२२ महिला आणि १६ तृतीयपंथीय मतदार होते. मतदानाची सरासरी टक्केवारी ७०.६०% होती, ज्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा वेगळा टक्का होता:

मलकापूर – ७१.१७%

बुलढाणा – ६२.३९%

चिखली – ७२.०७%

सिंदखेड राजा – ७०.२२%

मेहकर – ६८.९७%

खामगांव – ७६.०६%

जळगाव जामोद – ७३.५४%

या मतमोजणीद्वारे जिल्ह्यातील ७ विधानसभांच्या भविष्याचा निर्णय होईल, आणि कोणते उमेदवार विजयी होतात हे स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *