Headlines

पैसे घेण्यासाठी जातो सांगून मलकापुरातील 46 वर्षीय इसम बेपत्ता

मलकापूर (जि. बुलडाणा) येथील 46 वर्षीय अजय पांडुरंग निळे हे 24 नोव्हेंबर 2024 रोजी घरून बाहेर पडले आणि त्यानंतर त्यांचा अद्याप पर्यंत शोध लागलेला नाही. अजय यांनी घरातून बाहेर पडल्याच्या आधी संजय दांडगे यांच्या दर्पण फोटो स्टुडिओमध्ये पैसे घेण्यासाठी जात असल्याचे सांगितले होते. 10:30 वाजता त्यांनी फोन करून सांगितले की, रात्री 8:30 वाजता पैसे घेऊन घरी परततील. त्यानंतर अजय यांचा फोन बंद आल्याने त्यांचे कुटुंबीय चिंतेत पडले. त्यांनी अनेक ठिकाणी शोध घेतला, मात्र अजूनपर्यंत अजय यांचा काही ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे, त्यांच्या नातेवाईकांनी बुलडाणा पोलिस स्टेशनमध्ये मिसिंग रिपोर्ट दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!