मलकापूर: आज सकाळी घिर्णी रोड, बेलाड शिवारात अज्ञात व्यक्तीने एका रांगेत असलेल्या २० ते ३० शेतांमधील मका आणि जनावरांसाठी साठवलेला चारा पेटवून दिला, अशी धक्कादायक घटना घडली. या आगीत मोठ्या प्रमाणावर शेतीमाल जळून खाक झाला असून, शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. आगीचा प्रकार जाणवताच शेतकरी आणि ग्रामस्थांनी तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर नुकसानी झाली होती. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, हा घातपात की अन्य कोणते कारण, याचा शोध घेण्याची मागणी होत आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, आगीच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. शेतकऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अज्ञात व्यक्तीकडून घिर्णी रोड बेलाड शिवारात आग, २० ते ३० शेतांतील मका व चारा जळून खाक!
