Headlines

कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात 15 पेक्षा अधिक नामांकित कंपन्यांचा भव्य रोजगार मेळावा!

मलकापूर – पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा 18 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 8:30 वाजता पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथे संपन्न होणार आहे. या रोजगार मेळाव्यात 15 हून अधिक नामांकित कंपन्या सहभागी होत असून, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या मेळाव्यात उमेदवारांना थेट मुलाखतीच्या माध्यमातून भरती होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी नोंदणीसाठी येथे https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeK77EBDAilXntYQY6EfnxBfBtHeO_a_z0idaf3uYUeinNmOQ/viewform या लिंक क्लिक करा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या रोजगार मेळाव्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आपले बायोडाटा, शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखपत्र आणि पासपोर्ट आकारातील फोटो सोबत आणावेत. या मेळाव्यासाठी अधिक माहितीसाठी प्रा. पी. व्ही. चोपडे (ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी) यांच्याशी 9011979615 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच, श्री. योगेश लांडकर (यंग प्रोफेशन, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलढाणा) यांच्याशी 7447473585 या क्रमांकावर संपर्क साधावा. आय क्यू एसी अधिकारी प्राध्यापक रमाकांत चौधरी, प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे व प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी तरुणांना आवाहन करताना सांगितले की, “या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना आपल्या कौशल्याचा योग्य वापर करून नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळवण्याची संधी आहे. त्यामुळे सर्व इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा.

सोबतच जिल्ह्यातील युवा वर्गाने या सुवर्णसंधीचा लाभ घ्या, आपल्या करिअरला नवी दिशा द्या आणि उज्ज्वल भविष्यासाठी पहिले पाऊल टाका! असे आवाहन महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री डी एन पाटील उपाख्य नानासाहेब पाटील, सचिव डॉ अरविंद कोलते, खजिनदार श्री सुधीर भाऊ पाचपांडे यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!