बुलडाणा: बारावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल (१२ फेब्रुवारी) उघडकीस आली. ओजस (ओम) रमेश बाहेकर असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. वृंदावन नगरातील आपल्या घरी ओजसने छताला कपड्याच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. भारतीय सैन्यात सेवेत असलेले माजी सैनिक रमेश बाहेकर यांचा तो मुलगा होता. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल दुपारी ओजसचे आई-वडील घराबाहेर गेले होते. त्याच वेळी त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. ओजसने नुकतीच जेईई परीक्षा दिली होती. परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने तो नैराश्यात गेला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नुकताच पुण्यावरून बुलडाण्यात परतलेल्या ओजसच्या आत्महत्येने कुटुंबासह परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. पोलिसांनी घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.
आई-वडील घराबाहेर गेले, मुलाने घरात गळफास घेतला; बुलढाणा शहरातील घटना!
