शेगाव : तालुक्यातील अळसणा येथे २ ऑगस्ट रोजी दुपारच्या दरम्यान राहत्या घरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत नजमाबी शेख रफिक वय ३२ वर्ष रा. ग्राम आळसणा यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दिली. फिर्यादीच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांनी तक्रारीत म्हटले आहे की माझे मुले घरीच असल्याने घराला कुलुप न लावता बहीन आयशाबी हीचे अपंगाचे पैसे काढणे साठी शेगांव येथील स्टेट बँकेत गेली होती. शेगांव मधील काम झाल्यानंतर सायंकाळी ६ वा. घरी परत गेली. व रात्री जेवन करुन कुटुंबासह झोपले परंतु घरातील कपाटाकडे लक्ष दिले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वा सुमारास घरातील झाडु मारत असतांना कपाटाला लागुन खाली एक सोण्याची लंबी पोथ व दाग दागीने ठेवलेले रिकामे डब्बे दिसले म्हणून कपाट उघडुन पाहीले असता ड्रॉवर मध्ये ठेवलेले सोन्याचे दोन ग्रॅम पेंडल व सात ग्रॅम मणी असलेली पोथ कि.अ. १० हजार रुपये, सोन्याची अडीच ग्रॅम पेंडल व दीड ग्रॅम मणी असलेली पोथ कि.अ. १४ हजार ७०० रुपये व नगदी ४० हजार रुपये असा एकूण ६४ हजार ७०० रुपयेचा मुददेमाल कोणीतरी अज्ञात व्यक्तीने उघड्या घरातुन चोरुन नेल्याचे समजले. अशा तोंडी रिपोर्टवरुन कलम ३०३(२) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करत आहे.