मलकापूर :- मोताळा तालुक्यातील जयपूर कोथळी येथील निर्मला सोपान दाते, मुलगा अमोल सोपान दाते यांनी जयपूर कोथळी शिवारातील गट नंबर 509,170 वर एचडीएफसी बँकेतून दि. 31 ऑगस्ट 2018 रोजी 3,15,000/- तिन लाख पंधरा हजार रुपये कर्ज घेतले होते त्या प्रकरणी एचडीएफसी बँकेने तलाठी यांना लेखी पत्र देऊन गट नंबर 509 व 170 वर बोजा चढविला आहे. आई निर्मला दाते यांना कॅन्सर झाला असून उपचारासाठी पैशाची आवश्यकता असल्याने शेती विक्री काढली असून मुलगा अमोल दाते यांनी दि.10 डिसेंबर 2024 रोजी बँकेचे थकीत कर्ज व्याजासह तीन लाख 78 हजार रुपयाची उसनवारी करून बँकेत संपूर्ण कर्जाचा भरणा केला, बँक मॅनेजर विनोद उके यांचेकडे सातबारा वरील बोजा उतरविण्या संदर्भात तलाठी यांना पत्र मागितले असता ते पत्र देण्यास टाळाटाळ करून तब्बल दीड महिना उलटून गेला यादरम्यान आईचा कॅन्सरचा उपचार रखडला आहे आज दि. 21 जानेवारी रोजी बँक मॅनेजर यांना एक निवेदन देऊन पाच दिवसात शेतीवरील बोजा उतरविण्यासंदर्भात लेखी पत्र न मिळाल्यास प्रजासत्ताक दिना च्या पूर्वसंध्येला दि.25 जानेवारी रोजी एच.डी.एफ सि बँकेसमोरच आमरण उपोषणाचा इशारा शिवसेना (उ.बा.ठा)शहर प्रमुख गजानन ठोसर सह निर्मला दाते,अमोल सोपान दाते यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, मलकापुर येथील एच.डी.एफ.सी बँकेतून दि. 31 ऑगस्ट 2018 तीन लाख पंधरा हजार रुपये कर्ज काढले होते या कर्जापोटी एचडीएफसी बँकेने तलाठी यांचे मार्फत गट नंबर 509 आणि गट नंबर 170 च्या सातबारावर बोजा चढविला आहे ,आईला कॅन्सर झाल्याने आम्ही सदर शेत हे उपचारासाठी विक्री काढले असून जोपर्यंत शेताच्या सातबारावरील बोजा कमी होत नाही तोपर्यंत कुणीही शेत खरेदी विक्री चा व्यवहार करीत नसल्याने उसनवारी करून आम्ही एच.डी.एफ सी बँकेचे व्याजासह तीन लाख अठ्ठयाहत्तर हजार रुपयाचा भरणा दि.10 डिसेंबर 2024 रोजी केला आहे, सातबारा वरील बोझा ची रक्कम व्याजासह भरणा केल्यावर बँकेचे मॅनेजर विनोद उके यांचेकडे सातबारा वरील बोजा उतरण्यासाठी तलाठी यांना लेखी पत्र देण्याची मागणी केली असता त्यांनी टाळाटाळ चालविली आहे, वरिष्ठांकडून मॅसेज आल्यावरच मी ते पत्र देईल असे उद्घटपणाची उत्तर देत त्यांनी तब्बल दीड महिना चाल ढकल केली आहे यामुळे माझ्या आईचा कॅन्सरचा उपचार रखडला आहे पाच दिवसाच्या आत बोजा उतरण्यासाठी लेखी पत्र न मिळाल्यास शिवसेना (उ.बा.ठा) पदाधिकाऱ्यांसह कॅन्सरग्रस्त आई आणि मी एचडीएफसी बँकेसमोर आमरण उपोषणास बसणार आहे उद्भवणाऱ्या परिस्थितीस एचडीएफसी बँक प्रशासन जबाबदार राहील निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी,शहर पोलीस निरीक्षक यांना देण्यात आली आहे.