मलकापूर ( उमेश ईटणारे ) 20 नोव्हेंबर : मलकापूर नांदुरा विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. यानंतर मतदारसंघात ‘यंदा गुलाल कुणाचा?’ या प्रश्नावर विविध चर्चांना उधाण आले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर प्रचार सुरु आहे. दोन्ही पक्षांची जोरदार तयारी असली तरी अंतिम निकाल 23 नोव्हेंबरला येणार आहे, आणि त्या दिवशीच गुलाल कुणाच्या फडात उधळला जाईल, हे स्पष्ट होईल.या निवडणुकीत मलकापूर नांदुरा मतदारसंघातील एकूण 2 लाख 4 हजार 32 मतदार त्यांचा प्रतिनिधी ठरवण्यासाठी मतदान केले आहेत. दोन प्रमुख पक्षांमधील हॉट कॉम्पिटिशनमुळे या निवडणुकीला अधिकच रंगत आली आहे. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि समर्थक 23 नोव्हेंबरच्या निकालासाठी उत्सुक असून, प्रत्येक वॉर्डमध्ये विजय मिळवण्याची धडपड सुरू आहे. 23 तारखेच्या निकालावर सर्वांचे लक्ष असेल, कारण प्रत्येकाने आपल्या परिश्रमांची किमत दाखविण्यासाठी अनेक रणनीती रचल्या आहेत. 23 तारखेला या प्रचंड प्रतिस्पर्धी रणभूमीतील ‘गुलाल कुणाचा?’ याचे उत्तर मिळणार आहे.