मलकापूर :- नगर सेवा समिती द्वारा संचालित लि. भो. चांडक विद्यालयात शाळेत स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने, उपक्रमशील शिक्षक श्री तोमर सर यांच्या ‘शिक्षण आणि संस्काराची गंगोत्री’ या ई-फ्लॅप बुकचे प्रकाशन उत्साहात पार पडले. या प्रकाशन सोहळ्यात शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, पालक, आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या ई-फ्लॅप बुकमध्ये चांडक शाळेत घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचा, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा आणि शाळेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक परंपरेचा थोडक्यात आढावा घेतला आहे. या प्रसंगी मा. कार्यवाह दामोदरजी लखाणी यांनी ई-फ्लॅप बुकचे विमोचन केले.
प्रकाशन सोहळ्यात, श्री तोमर सरांच्या या प्रकल्पची सर्वांनीच प्रशंसा केली. शाळेच्या शैक्षणिक प्रवासात या ई-फ्लॅप बुकचे योगदान निश्चितच भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे मान्यवरांनी नमूद केले. तोमर सरांनी शाळेच्या विकासासाठी घेतलेल्या अथक परिश्रमांचे प्रतिक म्हणून हे ई-फ्लॅप बुक शाळेच्या शैक्षणिक वारशाचे द्योतक ठरेल, अशी भावना शाळेच्या समस्त शिक्षकांनी व्यक्त केली. यावेळी सुगंचांदाजी भंसाली, संजयजी चांडक, डॉ. सुदीपजी देशपांडे, आणि मुख्याध्यापक डॉ. जयंत राजूरकर, अरुणसिंह राजपूत, विजय चव्हाण यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन मिलिंद काळे यांनी केले.