मलकापूर :भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना काल १६ ऑगस्ट रोजी रात्री शहरानजीकच्या – राष्ट्रीय महामार्ग ५३ वर घडली.
मलकापूर तालुक्यातील उमाळी गावातील गणेश पवार (वय ५०) हे आज रात्री १० वाजता पान्हेरा येथून काम आटोपून दुचाकीने गावी परत जात होते. या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ नजिकच्या बेलाड फाट्यावर गणेश पवार यांना भरधाव चारचाकी वाहनाने (क्रमांक एमएच ३० – बीएल ७७२२) धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.उमाळी गावातील काही ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत गणेश पवार यांना उपजिल्हा रुग्णालयात हलविले. तिथे डॉक्टरांनी पवार यांना मृत घोषित केले. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी दाखल होऊन चारचाकी वाहनासह चालकाला ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.