मलकापूर :- दादासाहेब धनाजी नाना चौधरी समाजकार्य महाविद्यालय, मलकापूर येथे दि. १२ ऑगस्ट २०१४ “मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजना” संदर्भात मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.प्रा.डॉ. राजेंद्रसिंह दिक्षीत सर (प्राचार्य, दादासाहेब धनाजी नाना चौधरी समाजकार्य महाविद्यालय, मलकापूर) यांनी भूषविले. तर प्रमुख अतिथी म्हणून श्रीकृष्ण उगले (नायब तहसिलदार, महसुल विभाग, मलकापूर), पारवे (योजना समन्वयक, मलकापूर), सचिन सोमवंशी हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व स्वामी विवेकानंद, संत गाडगे बाबा व रंगनाथन यांच्या प्रतिमांचे पुजन करुन करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले. पुढे कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. नरेंद्र काळबांडे सर (महाविद्यालयीन योजना समन्वयक) यांनी केले. त्यात “मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजना” संदर्भात मार्गदर्शन कार्यक्रमाचा हेतू व योजनेचे उद्देश सरांनी विशद केले. त्यानंतर पारवे (योजना समन्वयक, मलकापूर) यांनी “मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजना” संदर्भात मार्गदर्शन केले. त्यात विविध व्यावसायिक अभ्यासक्रम, रोजगाराच्या विविध संधी, कौशल्य विकासाची आवश्यकता, स्वयंरोजगार कार्यालय व त्या मार्फत राबविण्यात येणारे उपक्रम याविषयी सविस्तर माहिती दिली. तर प्रमुख अतिथी श्रीकृष्ण उगले (नायब तहसिलदार, महसुल विभाग, मलकापूर) यांनी मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजनेचे लाभार्थी, निवडीचे निकष, या योजनेंतर्गत देणात वेणारे वेतन याबाबत मार्गदर्शन केले. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्षप्रा.डॉ. राजेंद्रसिंह दिक्षीत सर (प्राचार्य, दादासाहेब धनाजी नाना चौधरी समाजकार्य महाविद्यालय, मलकापूर) यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात बेरोजगार युवकांसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांविषयी माहिती दिली. “मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजना मार्गदर्शन कार्यक्रम” या कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. नरेंद्र काळबांडे हे होते. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. रविंद्र पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. आकाशसिंह राजपूत यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, कर्मचारी वर्ग व विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.