Headlines

खामगावच्या एमआयडीसीतील दोन कंपनीत चोरी; अडीच लाखांची रोकड लंपास, चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद..

खामगाव :- एमआयडीसीत १२ डिसेंबरच्या मध्यरात्री दोन वेगवेगळ्या उद्योगांमध्ये चोरीची घटना घडली. समृद्धी इंडस्ट्रीज आणि चिराऊ पावर प्रा. लि. या कार्यालयांमधून अज्ञात चोरट्यांनी एकूण अडीच लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे.प्राथमिक माहितीनुसार, मध्यरात्री १२.३० ते २.३० वाजेदरम्यान ही चोरीची घटना घडली. समृद्धी इंडस्ट्रीजच्या कार्यालयातून सुमारे १ लाख रुपयांची रोख तर चिराऊ पावर प्रा. लि.च्या…

Read More

नदीपात्रात आढळला 40 वर्षीय महिलेचा मृतदेह, खामगाव तालुक्यातील घटना!

  खामगाव : तोरणा नदीच्या पात्रात एका 40 वर्षीय महिलेचा मृतदेह सापडल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत महिलेचे नाव सरला राजू पांढरे असे आहे. त्या गावाजवळच्या तलावात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. 12 डिसेंबर रोजी सकाळपासून त्या बेपत्ता होत्या. त्यांचा मृतदेह स्थानिक लोकांना नदीच्या पात्रात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी पोलिसांना कळवले. पोलीसांनी पंचनामा करून…

Read More

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, अपघातात शिक्षक गंभीर जखमी; अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल!

खामगाव :- टाकळी फाटा येथील रस्त्यावर एक दुर्दैवी अपघात घडला असून, त्यात शिक्षक मोहन त्र्यंबक सालवे गंभीर जखमी झाले आहेत. शाळेतून घरी जात असताना समोरून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला, ज्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे.धडक दिलेल्या वाहनाचा क्रमांक एम. एच. १२ जीएफ ४४३९ असल्याचे…

Read More

पिकाला पाणी देण्यासाठी मोटर’ चालू करत असताना ‘शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू! खामगाव तालुक्यातील घटना

खामगाव: तालुक्यातील राहुड शिवारात शेतातील इलेक्ट्रीक मोटर सुरू करताना शॉक लागून अशोक देविदास चव्हाण (४२) यांचा मृत्यू झाला. हे दुर्दैवी घटना ७ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता घडली. चव्हाण हे कुन्हा पारखेड येथील रहिवासी होते आणि शेताला पाणी देण्यासाठी मोटर सुरू करत होते. यावेळी शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.या घटनेबाबत चव्हाण यांच्या कुटुंबाने पिंपळगाव…

Read More

शेतातील पाइप वादातून दोन भावांमध्ये वाद, एकावर गुन्हा दाखल

खामगाव – कुंबेफळ येथील शिवारात दोन भावांमध्ये शेतातील पाइपवरून वाद निर्माण झाला. राजेंद्र बळीराम पारधी (४७) यांच्या शेतातील पाइप त्यांच्या भावाने, रवींद्र बळीराम पारधी यांनी स्वतःच्या शेतात नेला. विचारणा करताच वाद विकोपाला जाऊन राजेंद्र यांना अश्लील शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. पिंपळगाव राजा पोलिसांनी रवींद्र पारधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Read More

नायलॉन मांज्याने गळा चिरून एक जण गंभीर जखमी, खामगाव शहरातील घटना!

खामगाव : येथील किसन नगर भागात २ डिसेंबर रोजी नायलॉन मांज्याने एका दुचाकीस्वाराचा गळा कापल्या गेल्याने एक युवक गंभीरपणे जखमी झाल्याची घटना घडली. जखमी झालेल्या युवकावर खामगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.प्राप्त माहितीनुसार, महेबूब नगरातील शेख अलिम शेख अहमद (२७) हे सुटाळा बु. येथील एका दुचाकी शोरूममध्ये मॅकेनिक म्हणून काम करतात. सोमवारी नियमित काम…

Read More

आ.आकाश फुंडकर यांच्या अभिनंदनाचे बॅनर फाडले, पाच जणांवर गुन्हा दाखल

  खामगाव :- खामगाव विधानसभा मतदार संघात भाजपाचे युवा नेता आकाशदादा फुंडकर यांनी सलग तिसऱ्यांदा विजयी होवून हॅट्टीक केला आहे, ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. विजयानंतर कार्यकर्त्यांनी आकाशदादांचा अभिनंदन करण्यासाठी अनेक ठिकाणी बॅनर लावले होते, त्यात अमडापूर नाका येथील बॅनर देखील समाविष्ट होते.मात्र, २८ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ६ वाजता शिवसेना (शिंदे गट) चे पदाधिकारी…

Read More

गळफास घेऊन 58 वर्षीय इसमाने संपवली जीवनयात्रा! खामगाव तालुक्यातील घटना

खामगाव : तालुक्यातील जनुना येथील शेत शिवारात एका इसमाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुधाकर गणपत मुन्हेकर (५८) रा. जनुना यांनी आज दुपारी शेत शिवारात झाडाला साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. काही वेळाने ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. सदर इसमाने आत्महत्या का केली याचे…

Read More

बंद हॉटेल फोडून अज्ञात चोरट्यांकडून २२ हजाराचे साहित्य लंपास, खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

  खामगाव :- शहरातील महामार्गावरील टेंभूर्णा फाट्याजवळ असलेल्या बंद हॉटेलमधून अज्ञात चोरट्यांनी २२ हजार रुपयांचे साहित्य चोरी केल्याची घटना समोर आली आहे. कृष्णकांत राजविलास देशमुख यांच्या मालकीचे हॉटेल सरोवर काही दिवसांपासून बंद होते. रात्रभर चोरट्यांनी हॉटेलचे शटर तोडून आत प्रवेश केला व हॉटेलमधील विविध साहित्य लंपास केले. या साहित्यामध्ये १५ लोखंडी खाट, ४ सिलींग फॅन,…

Read More

पती – पत्नीच्या वादातून चाकूहल्ला; पत्नी गंभीर जखमी; खामगाव येथील घटना

खामगावः लग्न समारंभात पती-पत्नीच्या वादाने गंभीर रूप घेतले आणि पतीने पत्नीला चाकूने भोसकल्याची घटना शेगाव तालुक्यातील वरखेड खुर्द येथे शनिवारी (ता. २४) सकाळी घडली. शेख हातम शेख अब्दुला यांच्या घरी लग्नसमारंभ सुरू होता. यावेळी शे. मेहबुब शे. अजीज (वय ३५, रा. बर्डे प्लॉट, वरखेड खुर्द) आपल्या पत्नीसमवेत उपस्थित होता. सकाळी ९:३० वाजता पती-पत्नीमध्ये वाद झाला….

Read More
error: Content is protected !!