
मलकापूर बस स्थानकात चोरी, आईला उपचाराकरिता घेऊन जात असलेल्या प्रवाशाच्या खिशातील 15000 लांबविलेदिपक
मलकापूर ( उमेश इटणारे ):- आईच्या उपचाराकरिता जळगाव खा. येथे जाण्यासाठी मलकापूर बस स्थानकात आलेल्या प्रवाशाच्या खिशातील बसमध्ये चढताना पंधरा हजार रुपये लांबविण्याची घटना काल दि.19 रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास मलकापूर बस स्थानकात घडली. याबाबत ( नितीन वाघडे )यांनी पोलीस स्थानकात तक्रार दिली की त्यांना आईच्या उपचाराकरिता जळगाव खान्देश येथे जायचे होते. त्यासाठी ते…