१ लाखाचे ५ लाख देतो म्हणत मलकापूरमध्ये बोलावलं; सुनसान ठिकाणी नेऊन मारहाण, धमक्या देत सोन्याची चैन आणि रोकड लुटली” पाच आरोपी ताब्यात!
मलकापूर :- शहर पोलिसांनी ऑनलाइन अमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणारी आणि लुटमार करणारी टोळी अवघ्या तीन तासांच्या आत जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. दिनांक 18 नोव्हेंबर रोजी उल्हासनगर (जि. ठाणे) येथील तक्रारदाराने मलकापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. तक्रारीनुसार, आरोपी प्रदीप सुरेश जैन (वय 38, रा. शास्त्रीनगर, मलकापूर) याने एक लाखाचे पाच लाख देतो…
