
पाइपलाइनच्या व शेतरस्त्याच्या कारणावरून दोन कुटुंबात लोखंडी रॉडने हाणामारी, परस्पर तक्रारीवरून सहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल!
मोताळाः शेतरस्ता तथा पाण्याच्या पाइपलाइनच्या कारणावरून दोन कुटुंबात लोखंडी रॉड आणि काठीने हाणामारी झाल्याची घटना २२ मे रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास पोटा येथे घडली. प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटातील सहा जणांविरुद्ध बोराखेडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदुरा तालुक्यातील पोटा येथील रामेश्वर पुंडलिक सरोदे यांनी बोराखेडी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार बुधवारी सकाळी साडेआठ…