गौण खनीज प्रकरणात मोताळ्याचे लाचखोर नायब तहसीलदार रावळकर एसीबीच्या ताब्यात; मुरूम गाडीला परवानगी देण्यासाठी १४ हजारांची लाच मागितल्याचा आरोप
मोताळा (प्रतिनिधी) – गौण खनिज परवाना देण्याच्या मोबदल्यात १४ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मोताळा येथील नायब तहसीलदार कौतिकराव रावळकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने आज दुपारी ताब्यात घेतले. ही कारवाई मोताळा तहसील कार्यालयात थेट करण्यात आली असून, यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार नांदुरा तालुक्यातील असून त्याचा माती भरलेला ट्रक रावळकर यांनी…
