
अज्ञात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; संतप्त ग्रामस्थांचा रस्ता रोको, राष्ट्रीय महामार्ग 53 वरील वडी जवळील घटना!
नांदुरा :- तालुक्यातील वडी गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग ५३ वर दुचाकी आणि ट्रकच्या अपघातात ऋषिकेश शंकर खराटे (वय ४०, रा. माटोडा) यांचा मृत्यू झाला. मंगळवारी रात्री सुमारे ९ वाजता ऋषिकेश खराटे आपल्या दुचाकीवरून प्रवास करत असताना अज्ञात ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ नांदुरा येथील रुग्णालयात नेण्यात आले….