पोफळी येथे श्री संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्याची उत्साहात तयारी..

  मोताळा: भक्तीमय वातावरणात पोफळी येथे दरवर्षीप्रमाणे श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गावकरी आणि भाविक भक्तांच्या सहकार्याने हा सोहळा भक्तिरसात पार पडणार आहे. यंदा दि. 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता श्रींची आरती होणार असून, त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणाने न्हाऊन…

Read More

कोलते इंजिनिअरिंगच्या एनएसएस शिबिराने ‘सात दिवस, सात संकल्प’ मोहिमेने धरणगावात केला सामाजिक सेवेचा महायज्ञ!

  मलकापूर: स्थानिक पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष सात दिवशीय श्रम संस्कार शिबीर नुकतेच संपन्न झाले. दिनांक 10 फेब्रुवारी 2025 ते 17 फेब्रुवारी 2025 या कालावधीत जि. प. प्राथमिक मराठी शाळा धरणगाव येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 11फेब्रुवारी 2025 रोजी उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला उद्घाटनासाठी प्रमुख…

Read More

शेतकरी महिलेला कापूस विक्रीत लाखोंचा गंडा; मलकापूर तालुक्यातील घटना

  मलकापूर :- शेतकऱ्यांच्या कष्टाचा मोबदला लाटण्याचा प्रकार पुन्हा समोर आला आहे. नात्यातील बेबी नीना घुले या शेतकरी महिलेला कापूस विक्रीच्या नावाखाली तब्बल ९ लाख १३ हजार ६०० रुपयांचा फसवणुकीचा फटका बसला आहे. भालगाव (रण) येथील बेबी घुले यांनी मागील दोन वर्षांतील १११ क्विंटल ४० किलो कापूस अमोल बबन घुले व त्यांच्या सहकाऱ्यांना विकला होता….

Read More

शेतात बांधलेल्या गायीची चोरी, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल, शेगाव तालुक्यातील घटना

  शेगाव: तालुक्यातील टाकळी नागझरी शिवारात गाईच्या चोरीची घटना समोर आली आहे. आशिष पांडुरंग कराळे यांच्या शेतात बांधलेली अंदाजे १५ हजार रुपये किमतीची गाय अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना ११ फेब्रुवारीच्या रात्री ११ ते १२ फेब्रुवारीच्या पहाटे ४ वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी कराळे यांनी शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध…

Read More

व्हॉईस ऑफ मीडियाची मलकापूर कार्यकारणी जाहीर.. निवडणूक घेऊन करण्यात आली निवड

  मलकापूर : – पत्रकारांचे न्याय हक्कासाठी लढणारी देशव्यापी पत्रकारांची संघटना व्हॉईस ऑफ मिडियाच्या मलकापूर तालुका व शहर कार्यकारणी निवड प्रक्रिया दि. १३ फेब्रुवारी रोजी संघटनेचे राज्य कार्यवाह लक्ष्मीकांत बगाडे व जिल्हाध्यक्ष  सपकाळ यांच्या उपस्थितीत पार पडली. यामध्ये निवडणूक प्रक्रियेद्वारे बहुमताने तालुकाध्यक्षपदी धीरज वैष्णव तर शहर अध्यक्षपदी समाधान सुरवाडे, कार्याध्यक्षपदी विलास खर्चे यांच्यासह आदी पदाधिकाऱ्यांची…

Read More

अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन, इसमाविरुद्ध गुन्हा दाखल; मलकापूर तालुक्यातील घटना!

  मलकापूर : तालुक्यातील मौजे घिर्णी येथे अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी महादेव लक्ष्मण राऊत या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर मलकापूर शहर पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला. तक्रारीनुसार, दि. ७ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता आरोपीने पीडितेला धक्का मारून “तुला १० तारखेला पाहून घेतो” अशी धमकी दिली. त्यानंतर तो घराच्या गच्चीवर जाऊन…

Read More

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तरुणांना भरधाव बसची धडक; एक ठार, दुसरा गंभीर जखमी, चिखली-बुलढाणा मार्गावरील सवणा फाट्याजवळील घटना!

  चिखली :- चिखली-बुलढाणा मार्गावरील सवणा फाट्याजवळ भीषण अपघातात एक तरुण ठार, तर दुसरा गंभीर जखमी झाला. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन युवकांना भरधाव एसटी बसने जोरदार धडक दिल्याने हा दुर्दैवी प्रकार घडला. या अपघातात आलोक श्यामलाल शिंगणे (३०) याचा जागीच मृत्यू झाला, तर अक्षय रमेश पट्टे (२६) हा गंभीर जखमी असून, त्याच्यावर चिखलीतील एका खासगी…

Read More

दारूच्या नशेत मुलाने आईला जिवंत पेटविले, आरोपी अटकेत; संग्रामपूर तालुक्यातील घटना!

  संग्रामपूर (दि. ९) – दारूच्या नशेत स्वतःच्या आईला जिवंत पेटविल्याची धक्कादायक घटना पातुर्डा (ता. संग्रामपूर) येथे घडली. गौरव देशमुख याने ‘तू घातलेली साडी मला हवी’ म्हणत आई मीनाबाई यांच्या कपड्यांना आग लावली. यात त्यांचे पाय व तळपाय भाजले असून त्यांच्यावर शेगाव शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी…

Read More

चोरटे भले हुशार; खिडकीतून घरात प्रवेश केला अन ७३ हजारांचा ऐवज चोरून नेला.. शेगाव तालुक्यातील वरुड येथील घटना!

  खामगाव: शेगाव तालुक्यातील वरूड येथे चोरट्यांनी घरफोडी करत ७३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ऋषीकेश पंजाबराव कोकाटे यांच्या घराच्या खिडकीतून चोरट्यांनी आत प्रवेश केला. स्वयंपाकघरातून त्यांनी मुख्य दरवाज्याची कडी तोडून कपाटातील रोकड, दागिने आणि दोन मोबाईल चोरले. चोरीस गेलेल्या मालामध्ये ५० हजार रुपये रोख, १५ हजारांचे सोन्याचे दागिने आणि दोन…

Read More

उमाळी-वरखेड रस्त्यावर दोन दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी!

  मलकापूर :- तालुक्यातील उमाळी-वरखेड रस्त्यावर 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात अरुण राजाराम तडके (55, वरखेड) यांचा जागीच मृत्यू झाला, तर सूरजपाल सुभाषसिंह राजपूत (34) आणि अर्जुन मानसिंह राजपूत (17, उमाळी) गंभीर जखमी झाले. अरुण तडके हे MH 28 AA 7652 क्रमांकाच्या…

Read More
error: Content is protected !!