एकाच रात्री चार घरे फोडली, ६.४४ लाखांचा ऐवज लंपास; शेगाव तालुक्यातील माटरगाव येथील घटना!

  जलंब – शेगाव तालुक्यातील माटरगाव येथे ४ एप्रिलच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्रीत चार घरे फोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ६ लाख ४४ हजार २०० रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी अमित आळशी यांच्या घरातून एकूण ५ लाख ६५ हजारांचे दागिने व रोकड चोरली….

Read More

विषारी औषध प्राशन करून २० वर्षीय तरुणाची आत्महत्या, मोताळा तालुक्यातील खरबडी येथील घटना!

  मोताळा :- तालुक्यातील खरबडी येथील २० वर्षीय युवकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना १ एप्रिल रोजी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मृत युवकाचे नाव ओम दिलीप किनगे असे असून, विष घेतल्यानंतर त्याची प्रकृती गंभीर झाल्याने नातेवाइकांनी त्याला तातडीने बुलढाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले….

Read More

किरकोळ वादातून चाकूहल्ला, दोघे गंभीर जखमी; खामगाव तालुक्यातील शेलोडी येथील घटना!

  खामगाव: किरकोळ वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन चाकूहल्ल्याची गंभीर घटना शेलोडी (ता. खामगाव) येथे सोमवारी रात्री ९:३० वाजता घडली. या हल्ल्यात एका वृद्धासह त्याच्या मुलालाही गंभीर जखमी करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनोहर विश्वनाथ गाडे (३७) यांच्या काका रघुनाथ हरिश्चंद्र गाडे यांचा पवन दशरथ बानाईत याच्यासोबत पूर्वी किरकोळ वाद झाला होता. या वादानंतर पवन…

Read More

विद्युत धक्क्याने सहाय्यकाचा मृत्यू, गुन्हा दाखल; मोताळा तालुक्यातील घटना!

  मोताळा:- तालुक्यातील बोरखेडी येथे विद्युत दुरुस्ती करताना शेतात विजेचा धक्का बसून एका विद्युत सहाय्यकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. विशेष म्हणजे, या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर दुर्लक्ष केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 17 फेब्रुवारी रोजी सकाळी घडली. मृत व्यक्तीचे नाव हनुमान चव्हाण (वय ४९) असे असून, ते विद्युत महावितरण कंपनीत सहाय्यक…

Read More

खामखेड येथे विहिरीत आढळला ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह; मलकापुरातून दोन दिवसांपासून होते बेपत्ता..

  मलकापूर :- येथील दुर्गानगर परिसरातील ४५ वर्षीय पुरुषाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृताचे नाव किशोर रतन पाटील असे असून, ते दोन दिवसांपासून बेपत्ता होते. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव खांदेश येथे राहणारे व सध्या दुर्गानगर, मलकापूर येथे वास्तव्यास असलेले किशोर पाटील २५ फेब्रुवारीपासून बेपत्ता होते. कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, मात्र…

Read More

विष प्राशन केल्याने 42 वर्षीय महिलेचा मृत्यू, खामगाव तालुक्यातील घटना!

  खामगाव (प्रतिनिधी) – हिंगणा उमरा (ता. खामगाव) येथील एका ४२ वर्षीय महिलेने विष प्राशन केल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. रजनी विजय जुमडे यांनी २० फेब्रुवारी रोजी अज्ञात कारणाने विष सेवन केले. प्रकृती बिघडल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या…

Read More

शेतातून 40 कट्टे हरभरा चोरी, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल, शेगाव तालुक्यातील घटना

  शेगाव – तालुक्यातील भोनगाव येथे अज्ञात चोरट्यांनी शेतातून तब्बल ४० कट्टे हरभरा लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भोनगाव येथील शेतकरी राजेश विलासराव शेळके (वय ४९) यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या माहितीनुसार, गट क्रमांक ५३६ व ५३७ मधील शेतात रब्बी हंगामासाठी हरभऱ्याची लागवड करण्यात आली होती. २१ फेब्रुवारी रोजी…

Read More

कोलवड शिवारात घरफोडी; 2 लाख ९३ हजाराचा ऐवज लंपास, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

  बुलढाणा: कोलवड शिवारात घरफोडीची घटना घडली असून चोरट्यांनी घरातील सर्व सदस्य झोपेत असल्याची खात्री करून मागील दरवाजातून प्रवेश केला. घरातील लोखंडी दागिन्यांची पेटी उचलून ती शेतात नेली आणि त्यातील सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण २ लाख ९३ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी दीपक गोपाळा काटे (वय ३९, रा. कोलवड)…

Read More

विजेचा शॉक लागून 50 वर्षीय इसम गंभीर जखमी, शेगाव तालुक्यातील घटना!

  शोेगाव : तालुक्यातील वानखेड येथील ५० वर्षीय इसम २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजता शेतात मोटर बंद करण्यासाठी गेले असता विजेचा शॉक लागून गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर अवस्थेत त्यांना येथील साईबाई मोटे सामुदायिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा मुलगा सतीश परसराम मोटे यांनी तातडीने त्यांना रुग्णालयात भरती केले. प्राथमिक उपचारानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना…

Read More

नऊ वर्षाच्या मुलीवर अत्याचार; ६० वर्षीय आरोपीला अटक; शेगांव तालुक्यातील धक्कादायक घटना!

  शेगाव – तालुक्यातील ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावात नऊ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना २१ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली आहे. पीडित मुलीच्या ३७ वर्षीय आईने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी माणिकराव दामोधर (वय ६०) याने मुलीला पैशाचे प्रलोभन दाखवून आपल्या घरात नेले आणि खोलीत लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास…

Read More
error: Content is protected !!