स्टीअरिंग बिघडले, एस.टी. बस रस्त्यावरून घसरली; तिघे जखमी नादुरुस्त बसेसचा धोका कायम; प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह; लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष?
शेगाव – शेगाव-पातुर्डा मार्गावर सोमवारी सकाळी धावणारी एस.टी. बस (MH-40 Y-5395) अचानक स्टीअरिंग बिघडल्याने रस्त्याच्या कडेला घसरली. सुदैवाने बस निंबाच्या झाडावर अडकल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात तीन प्रवासी जखमी झाले असून, २५ प्रवाशांचा जीव संकटात सापडला होता. अपघातात नारायण सम्रत वानखडे (८५) आणि मोहम्मद फिरोजोद्दीन कुतुबोद्दीन (५४, दोघे रा. पातुर्डा) किरकोळ जखमी झाले, तर…
