घर बांधकामासाठी पैसे आणण्यासाठी विवाहितेचा दोन वर्ष छळ; सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा
मोताळा: हुंड्यासाठी एका २६ वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याची घटना दि. १० जानेवारी २०२२ ते २ एप्रिल २०२४ दरम्यान चिखली तालुक्यातील किन्होळा येथे घडली. याप्रकरणी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील राजूर येथील कविता देविदास खरात या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पती देविदास जयसिंग खरात, सासू निर्मला…
