Headlines

“एका निष्काळजी उपचाराने भविष्य अंधारले…”दुर्गेश भारंबेच्या उपचारप्रकरणी अखेर एक वर्षानंतर डॉ. राहुल चोपडेंविरुद्ध गुन्हा दाखल; शिवसेना उबाठाच्या पाठपुराव्याला यश

मलकापूर 🙁 विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) “मुलगा एका अपघातातून वाचला होता… पण डॉक्टरांच्या चुकीने त्याचा पाय कायमचा गमावला!” अशा शब्दांत दुःख व्यक्त करणाऱ्या पूनम भारंबे यांचा आवाज आज न्यायाच्या दिशेने पोहोचला आहे. अपघातानंतर उपचारासाठी नेण्यात आलेल्या त्यांच्या २० वर्षीय मुलावर डॉ. राहुल चोपडे यांनी दाखवलेली बेफिकिरी अखेर गुन्हेगारी चौकशेच्या टप्प्यावर पोहोचली आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की १३ मार्च २०२४ रोजी दुर्गेश विश्वनाथ भारंबे याला झालेल्या अपघातानंतर मलकापूर येथील चोपडे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर काही दिवसांनी दुर्गेशच्या पायात असह्य वेदना व सूज निर्माण झाली. त्रास अधिक वाढल्यानंतर पुन्हा चोपडे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या निष्काळजी उपचारपद्धतीमुळे त्याच्या पायात गंभीर संक्रमण (पस) झाले आणि वेळ गेलेली असल्याने तो पाय कायमचा निकामी झाला. पुन्हा विविध डॉक्टरांकडे उपचार घेऊनही काही फरक पडला नाही. अखेर दुर्गेशची आई पूनम भारंबे यांनी ४ मे २०२४ रोजी मलकापूर पोलीस ठाण्यात डॉक्टर चोपडेंविरुद्ध तक्रार दाखल केली. परंतु पोलिसांनी या तक्रारीची दखल घेतली नाही.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत शिवसेना उबाठा तालुकाप्रमुख दीपक चांभारे पाटील यांनी पुढाकार घेतला. त्यांनी पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन केले, शल्यचिकित्स कार्यालयासमोर निदर्शने केली. तत्कालीन ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या विरोधात उपहासात्मक आरती करून निषेध व्यक्त करण्यात आला. शेवटी ३१ मे २०२५ रोजी, तब्बल एक वर्षांनंतर, डॉ. राहुल रमेश चोपडे यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक ३४०/२५, भारतीय दंड संहिता कलम ३३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“डॉक्टरच्या बेजबाबदारपणामुळे रुग्णांवर अन्याय होत असेल किंवा जीव धोक्यात येत असेल, तर मलकापूर शिवसेना उबाठा गप्प बसणार नाही.”
– दीपक चांभारे पाटील, तालुकाप्रमुख, शिवसेना उबाठा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!