Headlines

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ

बुलडाणा:  दि. 25: अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील निकषानुसार पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ दिला जातो. सन 2024-25 या वर्षापासून नव्याने कार्यरत होत असलेले ऑनलाईन पोर्टल हे शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरीता एकत्रित तयार केले असल्याने शासकीय वसतिगृहास ऑनलाईन अर्ज करणाऱ्या पात्र अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांची गुणवत्तेअभावी निवड शासकीय वसतिगृहात झालेली नाही अशा विद्यार्थ्यांचे अर्ज प्रणालीव्दारे स्वाधार योजनेकरीता ग्राहय धरले जाऊन नियमानुसार पडताळणीबाबत कार्यवाही करण्यात येईल.

शैक्षणिक सत्र 2024-25 करीता वसतिगृह प्रवेश व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन करण्यात आलेला असून याबाबतचे अर्ज ऑनलाईन पोर्टल व्दारे स्विकारण्यात येत आहेत.शैक्षणिक संस्थामध्ये काही अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया अद्यापही सुरु आहेत ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्याना सन 2024-25 या वर्षासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज दि. 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत करण्यास मुदत वाढ दिली आहे. बुलडाणा शहरात इयत्ता 10 वी नंतरचे शिक्षण घेत असलेल्या केवळ अनुसूचित जातीव नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांनीच पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याचे आावहन सहाय्यक आयुक्त, मनोज मेरत, समाज कल्याण बुलडाणा यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!