मलकापुर:- वाकोडी ग्रामपंचायत हद्दीतील आदर्श नगर सहजीवन गृहनिर्माण संस्थेच्या रहिवासी वस्तीमध्ये नव्याने सुरू झालेले श्रेयस बियरबार व मटन हॉटेल बंद करण्याच्या मागणीसाठी महिलांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून सदरचा श्रेयस वाईनबार व मटन हॉटेल तात्काळ बंद करा अन्यथा 13 ऑगस्ट पासून महिला बार समोरच आमरण उपोषण करतील असा इशारा जिल्हाधिकारी देण्यात आला होता.
दि.13 ऑगस्ट मंगळवार पासुन सौ.मनिषा मिलिंद ढाके, सौ.वैशाली सुभाष धारस्कर,सौ.ज्योती विवेक रोकडे,सौ.वंदना संजय महाजन, सौ.दिपाली रविंद्र पाटील,सौ.हेमांगी नरेंद्र कुमावत,सौ.जयश्री रविंद्र रोकडे,सौ.संगिता राजेंद्र कोलते, किर्ती राजेंद्र तायडे सह महिलांनी श्रेयस बियर बार व मटन हॉटेल समोरच आमरण उपोषणाला सुरुवात केली यावेळी महिलांनी “बियरबार बंद झालाच पाहिजे….असा कसा होत नाही… झाल्याशिवाय राहणार नाही” अश्या घोषणा दिल्या यावेळी महिलांच्या आमरण उपोषणाला आदर्श नगर, साई नगर परीसरातील सौ.चंदा अनिल टेकाडे,सौ.निता महेश नारखेडे,सौ.अंजली सागर बेलोकार,सौ. लता सुधाकर थापडे,सौ. संगीता विजय नारखेडे सौ.सरिता लक्ष्मण डाके,सौ. अश्विनी निलेश खाचणे,लक्ष्मी ज्ञानदेव बोंबटकार,सौ.वर्षा गजानन ठोसर, रेणुका मांडवेकर, सौ.योगिता ठोसर,सौ.अलका ठोसर,सौ.मंगला कहाते, वंदना गणगे,सरीता सोनार सह परीसरातील ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे.
या उपोषण मंडपास मलकापुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश ऐकडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.उमाताई तायडे, अस्तित्व संघटनेच्या प्रेमलताताई सोनोने, माजी नगराध्यक्ष ॲड हरीश रावळ, शिवसेना जिल्हाप्रमुख (उ.बा.ठा) वसंतराव भोजने, शहरप्रमुख गजानन ठोसर,भा.रा.काॅ शहराध्यक्ष राजु पाटील,रा.काॅ.शहराध्यक्ष अरुण अग्रवाल,शहर उपाध्यक्ष डाॅ.सुभाष तलरेजा,श्रावण वाघ सह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांनी उपोषण मंडपास भेट देऊन पाठींबा दिला होता.
दि.16ऑगष्ट रोजी आमरण उपोषणाच्या चौथ्या दिवशी जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी आदर्श नगरातील श्रेयस बियर बार व हाॅटेल तसेच त्या शेजारील साहिल बियर शाॅपी या दोघांना एका आदेशान्वये सिल करण्याचे एका पत्रकाद्वारे राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना आदेशित केले या आदेशाची प्रत घेऊन तहसीलदार राहुल तायडे, नायब तहसीलदार उगले, शहर पोलीस निरीक्षक गिरी, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी शिंदे हे आमरण उपोषण मंडपात दाखल झाले आमरण उपोषणास बसलेल्या महिलांना जिल्हाधिकारी यांनी दिलेले पत्र देऊन निंबु शरबत देत त्यांच्या उपोषणाची सांगता केली, आदर्श नगरातील श्रेयस बिअर बार व मटन हॉटेल बंद झाल्याने उपोषणकर्त्यां महिलांचा आदर्श नगर व सहजीवन गृहनिर्माण सोसायटीच्या पदाधिकारी व महिला सदस्यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत केले यावेळी संजय तायडे, संजय महाजन,मिलिंद ढाके,सुभाष धारस्कर,रविंद्र रोकडे,विवेक रोकडे, रविंद्र पाटील,सुधाकर पाटील, सागर बेलोकार,सौ.चंदाताई टेकाडे, रविंद्र सातव, सौ सिमा सातव, विजय तायडे, सौ सारीका तायडे, महानंदा इंगळे, सौ मनिषा इंगळे, मुन्ना भाऊ निकम, राजेंद्र ओंकार तायडे ,गजानन जोशी, सौ मिना जोशी, अतुल पाटील, सौ सुरेखा पाटील, उत्तमराव राणे, लक्ष्मण खाचणे, निलेश नारखेडे,मिलिंद बढे,सौ ममता बढे,गजानन बराटे, सौ सुलभा बराटे,जनार्दन इंगळे, श्रीनिवास रोकडे, सुभाष बढे,योगेश निकम, प्रेमचंद देशमुख, सौ राजश्री देशमुख, सौ उज्वला संजय तायडे,राजेंद्र कोलते, राजेश ठोसर,विष्णू चरखे, सौ संगीता विष्णू चरखे व इतर सर्व समस्त आदर्श नागर रहिवासी यांची उपस्थिती होती.