Headlines

हिराबाई संचेती कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे मतदार जनजागृती प्रभात फेरी व पथनाट्याचे आयोजन

मलकापूर:- माननीय उपविभागीय अधिकारी मलकापूर तथा 21 मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संतोष शिंदे यांच्या निर्देशाप्रमाणे स्वीप नोडल अधिकारी एन जे फाळके, सहा.नोडल अधिकारी एन बी शिंदे, आर एम वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हिराबाई संचेती कन्याशाळा मलकापूर या शाळेतील विद्यार्थिनींनी स्वीप कार्यक्रमांतर्गत मलकापूर शहरांतर्गत शिवाजीनगर आणि तहसील चौक या भागात पथनाट्य घेऊन तसेच रॅली काढून मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली. या रॅलीमध्ये इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी भाग घेतला. येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व मतदारांनी मतदान करून मतदानाची टक्केवारी वाढावी या उद्देशाने हिराबाई संचेती कन्या शाळा मलकापूर या शाळेमार्फत निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पालकांना संकल्प पत्र देणे, या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. सदर पथनाट्य सादर करतेवेळी नायब तहसीलदार श्रीकृष्ण उगले, गटशिक्षणाधिकारी एन जे फाळके , सहाय्यक लेखाधिकारी महेश बावणे, हिराबाई कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ ममता पांडे, शाळेचे शिक्षक शिक्षिका, सौ.खडसे, सौ जोशी, सौ गाढे, सौ सपकाळ, जोशी, वाघमारे,तसेच स्वीप टीम मधील प्रशांत देशमुख,शिक्षकेतर कर्मचारी बाठे, वरखेडे, इंगळे,उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!