
इम्पॅक्ट बातमी! विदर्भ लाईव्हच्या बातमीनंतर पाणीपुरवठा विभागाला जाग,माता महाकाली नगरातील जलवाहिनी दुरुस्तीला सुरवात..
मलकापूर ( उमेश इटणारे ):- विदर्भ लाईव्हच्या बातमीनंतर पाणी पुरवठा विभागाला जाग आली आहे.गेल्या महिनाभरापासून फुटलेल्या जलवाहिनीतून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत होता.मात्र या प्रकाराकडे महिना उलटूनही दुरुस्ती होत नसल्याने पाणीपुरवठा विभाग जाणून दुर्लक्ष करत आहे का अश्या मथळ्याखाली विदर्भ लाईव्हने पाणीपुरवठा विभागाचे लक्ष वेधण्यासाठी बातमी प्रकाशित केली होती. या बातमीची दखल घेत पाणीपुरवठा विभागाने…