Headlines

vidharbh

“प्रशासनाचा खुर्चीत आराम, पण रस्त्यावर जनतेचा हाहाकार!” – मलकापूरमध्ये नगर परिषदेच्या कारभारावर काँग्रेसचा हल्लाबोल

  मलकापूर:- रोजंदारीने जगणाऱ्या सामान्य नागरिकांचे पाणी, आरोग्य, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांसाठीचे जगणे अक्षरशः असह्य झाले असताना मलकापूर नगर परिषदेचा प्रशासन मात्र समाधानाच्या झोपी गेलेला आहे. त्याच प्रशासनाला जाग आणण्यासाठी काँग्रेस पक्षाने आक्रमक पवित्रा घेत बुधवारी निवेदनाच्या माध्यमातून तीव्र नाराजी व्यक्त केली. आमदार राजेश एकडे यांच्या आदेशावरून व ज्येष्ठ नेते डॉ. अरविंद कोलते, श्यामभाऊ राठी,…

Read More

विवाहितेवर सासरच्यांचा अमानवीय छळ; माहेरून पैसे आणि मालमत्तेतील वाटा मागण्याचा दबाव; शेगाव येथील घटना

शेगाव : एका ३० वर्षीय विवाहितेवर सासरच्या मंडळींकडून शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. माहेरून एक लाख रुपये आणावेत तसेच वडीलोपार्जित मालमत्तेत हक्क मागावा, या कारणावरून पीडितेवर सातत्याने अत्याचार होत होते. पीडितेने शेवटी शेगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिला हुरबानो…

Read More

गळफास घेऊन इसमाची आत्महत्या : आर्थिक अडचणींमुळे आत्महत्येचा संशय; रोहिणखेड येथील घटना

रोहिणखेड :- येथील श्रीकृष्ण संपत लवंगे (वय ५६) यांनी सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. श्रीकृष्ण लवंगे यांच्याकडे शेती नसून, त्यांनी राजर्षी शाहू बँकेकडून एक लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले होते. तसेच, त्यांच्या नावावर इतर खाजगी कर्जही असल्याची माहिती त्यांच्या…

Read More

ट्रक-दुचाकी अपघातात युवक ठार, मामा गंभीर जखमी; लग्न ठरलेल्या अजयचा जागीच मृत्यू; रस्त्यावरील बेशिस्त वाहतूक घातक

मोताळा:- लग्नाच्या तयारीचा आनंद काही क्षणातच शोकांतिका ठरली. मलकापूरकडे जात असलेल्या युवकाच्या दुचाकीला विटांनी भरलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने २९ वर्षीय अजय संजय कावने याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात त्याचा मामा सुरेश लोखंडे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर बुलडाणा येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही हृदयद्रावक घटना मोताळा-मलकापूर रोडवरील तालखेड फाट्यानजीक ५ मे…

Read More

‘स्वच्छ भारत केवळ पोस्टरवरच’ या बातमीचा दणका – कुलमखेल परिसरातील घाणीच्या साम्राज्याची बातमी फ्लॅश अन् कचरा साफ

  मलकापूर (दीपक इटणारे) – “विदर्भ लाइव्हने ” काल प्रकाशित केलेल्या ‘स्वच्छ भारत केवळ पोस्टरवरच – कुलमखेल परिसरात घाणीचे साम्राज्य’ या बातमीचा थेट परिणाम आज दिसून आला. नगरपरिषद प्रशासनाने कुलमखेल परिसरात तातडीने स्वच्छता मोहीम राबवत कचऱ्याचे ढीग हटवले. रहिवाशांनी यावेळी समाधान व्यक्त करत “माध्यमांनी आवाज उठवल्यानेच हा बदल घडला” अशी प्रतिक्रिया दिली. मंदिर परिसर, मुख्य…

Read More

“कष्टांची राखरांगोळी!” अज्ञाताने पेटवली सुडी, शेतकऱ्याचे ९० हजारांचे नुकसान; मोताळा तालुक्यातील तालखेडची घटना!

  मोताळा : – ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) तालखेड शिवारातील शेतात तयार करून ठेवलेली मक्याची सुडी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची घटना ३ मे रोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकारामुळे शेतकऱ्याचे सुमारे ९० हजार रुपयांचे नुकसान झाले असून, बोराखेडी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलास शालिग्राम अत्तरकर (रा. तालखेड) यांच्या गट…

Read More

आज बारावीचा निकाल 1 वाजता होणार जाहीर; निकालाची लिंक बातमीत

पुणे:- महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीचा निकाल ५ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळे: 👇👇👇👇👇👇👇👇 result.digilocker.gov.in mahahssboard.in hscresult.mkcl.org results.navneet.com results.targetpublications.org

Read More

स्वच्छ भारत केवळ पोस्टरवरच – कुलमखेल परिसरात घाणीचे साम्राज्य, नागरिक त्रस्त; प्रशासन धृतराष्ट्राच्या सोंगेत

  मलकापूर – “स्वच्छ भारत, सुंदर भारत” ही केंद्र सरकारची घोषणा प्रत्यक्षात केवळ पोस्टर आणि भाषणांपुरती मर्यादित राहिल्याचे विदारक चित्र मलकापूर शहरातील कुलमखेल परिसरात पाहायला मिळत आहे. या भागात रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी आणि मोकाट जनावरांचा वावर असल्याने स्थानिकांचे जीवनमान थेट धोक्यात आले आहे. दररोज सडलेल्या अन्नपदार्थांचा वास, प्लास्टिकच्या पिशव्या, औषधींचा कचरा आणि नाल्यांतील…

Read More

घरासमोर उभी केलेली कार चोरीला; एक संशयित ताब्यात, दुसरा फरार; मोताळा येथील घटना

मोताळा :- शहरातील प्रभाग क्रमांक १६ मध्ये घरासमोर लावलेली कार चोरट्यांनी लंपास केल्याची घटना १ मे रोजी सकाळी उघडकीस आली. गणेश नंदलाल झंवर यांच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, एकास ताब्यात घेतले आहे. झंवर यांनी ३० एप्रिल रोजी रात्री १०.४५ वाजता त्यांच्या (MH-28/AN/3161) क्रमांकाच्या कार घरासमोर पार्क केली होती. मात्र दुसऱ्या…

Read More

ऑटोत सवाऱ्या घेण्याच्या वादातून चाकू हल्ला; एक गंभीर जखमी, शेगाव येथील घटना!

  शेगाव:- शेगाव येथे ऑटोत सवाऱ्या घेण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण होऊन चाकूने हल्ला झाल्याची घटना ३० एप्रिल रोजी मध्यरात्री घडली. या हल्ल्यात ऑटोचालक व त्याचा भाऊ जखमी झाले असून, एकाची प्रकृती गंभीर आहे. फिर्यादी गणेश श्रीराम बावस्कर (३०, रा. संविधान चौक, शेगाव) याने दिलेल्या तक्रारीनुसार, रात्रीच्या सुमारास त्यांनी पाच सवाऱ्यांना आनंद विसावा येथे…

Read More
error: Content is protected !!